Talegaon : तळेगाव पोलीस नागरिकांशी साधणार ‘स्मार्ट संवाद’ पोलिसांची ‘व्हाट्स अप’ सेवा सुरु

एमपीसी न्यूज – परिसरातील नागरिकांना तात्काळ मदत करण्याच्या उद्देशातून तळेगाव दाभाडे पोलिसांनी व्हाट्स अप क्रमांक सुरु केला आहे. त्यामुळे आता नागरिकांना ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून देखील पोलिसांशी संवाद साधता येणार आहे.

9356336324 हा ‘व्हाट्स अप’ (बडी कॉप) क्रमांक सुरु करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिकांना या क्रमांकावर ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून संपर्क करता येणार आहे. अनेक वेळेला नागरिकांना पोलीस ठाण्याशी संपर्क करता येत नाही. तसेच फोनवर बोलण्यासाठी काही वेळेला नागरिक घाबरतात. त्यामुळे ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून संवाद साधून पोलीस मदत मिळवता येणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, नागरिकांशी ‘स्मार्ट संवाद’ साधण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींवर पोलीस तात्काळ प्रतिसाद देणार आहेत. सोशल मीडियाचा वापर समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी नागरिकांनी करावा, असे आवाहन देखील वाघमोडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.