Talegaon : वराळे गावातून तरुणाला 1 किलो गांज्यासह अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेजवळील (Talegaon) वराळे गावातून एका तरुणाला 1 किलो गांजासह पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई वराळे येथील भिमाशंकर कॉलनीत अंमली पदार्थ विरोधी पथकांच्या पोलिसांनी दुपारी केली.

जोहान वर्गीस क्कनट्टू (वय 25 रा.वराळे, मुळ केरळ) असे अटक आरोपीचे नाव असून पोलीस नाईक विजय दिपक दौंडकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : दारुंब्रे येथे एक लाखांची घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा (Talegaon) रचून आरोपीला अटक केले. यावेळी त्याच्याकडून 1 किलो 285 ग्रॅम वजनाचा 32 हजार 125 रुपयांचा गांजा व 700 रुपये रोख असा एकूण 32 हजार 825 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तळेगाव पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.