Talegaon News : इंद्रायणी नदीपात्रात बुडून एका युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणीकाठी गेलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. (Talegaon News) जयदीप पुरुषोत्तम पाटील असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवाशी आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे येथील डॉ.डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 7 ते 8 विद्यार्थी धुलीवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले असता, जयदीप पाटील याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित सावंत, (Talegaon News) पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी,पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन काचोळे, शिवाजी बांगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे त्यांची टीम दाखल झाली.
बोटीच्या साहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्याचा दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढला. बुडालेला विद्यार्थी हा अभियांत्रिकी संगणक तृतीय वर्षात शिकत होता. धुलीवंदन खेळणे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले. या अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहेत.
“वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत म्हणाले इंद्रायणी नदीपात्रात विद्यार्थी आंघोळ करण्यासाठी, पोहण्यासाठी येतात. नदीपात्राला तीव्र उतार असल्याने पाय घसरून बुडाल्याच्या (Talegaon News) घटनांमध्ये वाढ होत आहे. कुंडमळा इंदोरी येथे दरवर्षी नदीपात्रात बुडून 15 ते 20 मृतदेह मिळतात. तरुणाई ने स्वतः आवर घातला तर अशा घटना टळतील.