Talegaon : राहत्या घरातून तरुणी बेपत्ता

एमपीसी न्यूज – राहत्या घरातून तरुणी बेपत्ता झाली आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रपुरी कॉलनी येथे राहणा-या तरुणीबाबत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.

प्रणाली सचिन दौंड (वय 22, रा. इंद्रपुरी कॉलनी, तळेगाव दाभाडे. मूळ रा. पाचेगाव बु. ता. सांगोला, जि. सोलापूर) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.

  • प्रणाली 18 जून रोजी तिच्या राहत्या घरातून रात्री साडेआठच्या सुमारास बेपत्ता झाली. घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. याबाबत तिच्या नातेवाईकांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.