BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी पिस्तुल नेमबाजीत कस्तुरी गोरेची दोन वयोगटात निवड

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने घेतली दखल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत कस्तुरी गोरे हिची 17 व 21 वर्षाखालील दोन्ही गटात निवड झाली आहे. दोन्ही गटात खेळण्याची संधी मिळालेली ती पहिली मुलगी ठरली आहे. महावितरण कंपनीचे तळेगाव दाभाडे येथील उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे आणि राष्ट्रीय खेळाडू समिता गोरे यांची ती कन्या आहे.

बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात 15 ते 16 जानेवारी दरम्यान खेलो इंडिया स्पर्धा होत आहेत. त्यात सुवर्णपदाची प्रबळ दावेदार खेळाडू म्हणून कस्तुरीच्या नेमबाजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्यप्रदेश (इंदोर) येथे झालेल्या 64व्या राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कस्तुरीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत 400 पैकी 372 गुण मिळवून उत्कृष्ठ कामगिरी करून महाराष्ट्र संघासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. 2018 व 2019 मधील झालेल्या सर्व राष्ट्रीय शुटींग स्पर्धेमधील उत्कृष्ठ कामगिरीमुळे 21 वर्षाखालील गटामध्ये नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांचेकडून खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत तिची निवड झाली. कस्तुरीची जुळी बहिण केतकी देखील उत्कृष्ठ नेमबाज खेळाडू असून तिने विविध राष्ट्रीय शुटींग स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. दोन्ही बहिणी बालेवाडी शुटींग रेंज येथे प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू त्यांची आई समिता गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व स्तरांतील मान्यवरांकडून दोन्ही बहिणींचे अभिनंदन केले जात आहे.

HB_POST_END_FTR-A2

.