Talegaon : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार;चौघांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा (Talegaon) जणांनी मिळून एका तरुणावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाच्या कारची तोडफोड करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

 

 

 

Wakad : घरगुती कारणावरून पत्नीचा खून

 

अनिल जगन जाधव (वय 23, रा. तळेगाव दाभाडे), संजय ज्ञानेश्वर माळवदकर (वय 24, रा. तळेगाव दाभाडे), कुमार सुरेश मोहिते (वय 20, रा. वडगाव), हर्ष उर्फ सोन्या प्रमोद साठे (वय 19, रा. वडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बापू रिठे (रा. वडगाव), रोहन उर्फ चिक्या शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उदय अशोक लोंढे (वय 23, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे आणि आरोपी यांच्यात जुने वाद होते. त्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून पिस्तुल व कोयत्यासारखे हत्यार घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादीवर पिस्तुलमधून दोन राउंड फायर केले. तसेच फिर्यादीच्या कारची तोडफोड करून दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस (Talegaon) तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.