TalegaonDabhade : जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या वतीने उभारले निवाराशेड

एमपीसी न्यूज – निवाराशेडमुळे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण होऊन, मुला-मुलींची चांगली सोय होणार आहे, असे मत माई बालभवनच्या अध्यक्षा प्रतिक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले. संस्थांचे पदाधिकारी, शुभचिंतक व येथील विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत जायंट्स गृप ऑफ मावळ सखीच्या अध्यक्षा जयश्री टिळे, सचिव सुप्रिया पारखे, उपाध्यक्षा वंदना कोळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

जायंट्स ग्रुप तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अण्णाराव कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संदिप गोंदेगावे, ॲड. देविदास टिळे, सुरज कुर्डे, हिरामण बोत्रे, सुमित पारखे, स्वाती सुतार, सुनिता बोत्रे, स्वाती पंडित, संगीता कोळेकर, पल्लवी ओझरकर आदी उपस्थित होते.

  • जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या सदस्यांना जेव्हा निवाराशेडची गोष्ट समजली तेव्हा त्यांनी या अंगणाला छत घालायचे ठरवले. काही सदस्य आणि देणगीदार यांच्या माध्यमातून देणगी गोळा करून निवारा शेडचे काम पूर्ण करण्यात आले.

निवास व भोजन या प्राथमिक गरजांबरोबरच आरोग्य, शिक्षण व रोजगार या आघाड्यांवर हे विद्यार्थी सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी संस्था अव्याहतपणे कार्यरत आहे. सध्या या संस्थेने ३५ मुलींची व्यवस्था शितळानगर देहुरोड येथे भाड्याच्या जागेमध्ये केली असून जागेची कमतरता जाणवत होती. समोरच्या अंगणाला छत नसल्यामुळे ऊन, वारा, पावसाचा त्रास होत होता व जागा वापरात येत नव्हती.

  • “जायंट्स ग्रुप मावळ सखीचा प्रकल्प ” माई बालभवन शितळानगर, देहुरोड ही संस्था अंध, अपंग, अनाथ, एचआयव्ही बाधित मुले-मुलींचे आयुष्य घडविण्याचे काम गेले १२ वर्षे अखंडपणे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.