TalegaonDabhade : भानुदास ताठे यांचे निधन

एमपीसी न्यूज – सुदवडी – सुदुंबरे येथील जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी भानुदास पंढरीनाथ ताठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून पंचक्रोशीत आदर्श निर्माण केला. सुदवडी गावचे उपसरपंच नितीन ताठे आणि प्रगतिशील शेतकरी मधुकर ताठे यांचे ते वडील तर, ग्रामपंचायत सदस्या शीतल ताठे यांचे ते सासरे होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.