Talegaon Dabhade : ‘मावळ प्रबोधिनी’कडून यंदाचा दहिहंडी उत्सव रद्द; पूरग्रस्तांना करणार मदत

एमपीसी न्यूज -‘मावळ प्रबोधिनी’कडून तळेगाव दाभाडे येथे सालाबादप्रमाणे यंदाही होणारा ‘दहिहंडी उत्सव २०१९’ रद्द करण्यात येत असल्याची माहिती मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी दिली आहे.

या दहीहंडीस लाखो रुपयाची बक्षीसे ठेवण्यात येतात. कार्यक्रमासाठी सिनेतारका, सिनेनायक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर येत असतात. कोल्हापूर-सांगली येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे यंदाचा दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

  • ‘चला, एकत्र येऊ या, माणुसकीचे नाते जपुया’ या तत्वाप्रमाणे या कार्यक्रमासाठी होणारा खर्च पूरग्रस्त बांधवांसाठी मदतनिधी स्वरूपात सी.एम. रिलीफ़ फंड तसेच जनकल्याण समिती यांच्याकडे देऊ करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय आपत्तीच्या कार्यात मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी रवींद्र आप्पा भेगडे यांच्या जनसंपर्क कार्यालय, शांताई सिटी सेंटर, तळेगाव दाभाडे येथे जमा करावी, असे आवाहन मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी केले आहे.

  • तसेच मदतबाबत अधिक माहितीसाठी रविंद्र आप्पा भेगडे यांचे जनसंपर्क कार्यालय, शांताई सिटी सेंटर, तळेगाव दाभाडे येथे संतोष साखरे (99224 83915) आणि समाधान भोईरकर (91394 25008) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.