BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत हर्षदा, नम्रता यांनी पटकावले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – यवतमाळ येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या गटात इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील नम्रता कुंभार, हर्षदा गरूड, समीक्षा ढोरे, नेहा निळकंठे, निकिता निळकंठे व संचित कंक यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

त्यामध्ये नम्रता कुंभार हिने 40 किलो वजनी गटात स्नॅच 53 किलो व क्लिन आणि जर्क 62 किलो एकूण 115 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.

हर्षदा गरूड हिने 45 किलो वजनी गटात स्नॅच 60 किलो व क्लिन आणि जर्क 73 किलो एकूण 133 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.

या दोघींचीही पटणा (बिहार) येथे होणा-या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता निवड झाली आहे. क्रीडाशिक्षक प्रा प्रतिभा गाडेकर व सुरेश थरकुडे आणि बिहारीलाल दुबे यांनी मार्गदर्शन केले.

या उज्ज्वल यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संभाजी के. मलघे, उप प्राचार्य प्रा. अशोक आर. जाधव, स्टाफ सेक्रेटरी प्रा. संदीप पी. भोसले आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3