Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव शेलार यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नितीन ब्रास बँडचे मालक-विश्वस्त आणि जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक संपतराव दशरथ शेलार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षाचे होते.

त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, संजय शेलार, शिक्षक नेते नितीन शेलार यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.