Talegoan : गरजू तरुणांसाठी मोफत मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील रूडसेट स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने मोफत मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण शिबिर १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण २०११ च्या यादीत ज्या उमेदवारांचे नाव आहे आणि १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होता येणार आहे.  या प्रशिक्षणादरम्यान निवास, नाश्ता, चहा, जेवण, याची आयोजकांकडून विनामूल्य सोय करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी ९७६६६८०८१६, ७३५०००८०४८ व ०२११४-२७९१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.