Talegoan : शासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरुध्द अधिकाऱ्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील अग्निशमन पर्यवेक्षक यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरुध्द सी. आर.सामाजिक संघटने तर्फे संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड. हेमचंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष स्वप्नील निकाळजे यांच्या निर्देशनुसार मावळ तालुक्याचे उपाध्यक्ष अमोल रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश प्रसिध्दी प्रमुख पराग सोनवणे व मावळ तालुका अध्यक्ष अहमद बेग यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे  मुख्याधिकारी  वैभव आवारे यांस निवेदन सादर करण्यात आले

निवेदनात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अंतर्गत विभागातील अन्याय होणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य मिळावे व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.