Talegaon Dabhade : पॅशन, प्रॅक्टिस आणि पोटेन्शियल यामुळे आत्मसन्मानाची झळाळी वाढते – डॉ. कविता तोटे

एमपीसी न्यूज – रोज स्वतःशी दोन मिनिटे संवाद साधत जगण्याला सराव, उत्कटता आणि क्षमतांची जोड दिल्यास जगणे परिपूर्णतेच्या दिशेने जाते.(Talegaon Dabhade) पॅशन, प्रॅक्टिस आणि पोटेन्शियल यांमुळे आत्मसन्मानाची झळाळी वाढते, असे मत वडगाव मावळ येथील अध्यापक महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. कविता तोटे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालयात बीसीए बीबीए- सीए विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत डाॅ तोटे बोलत होत्या. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विभाग प्रमुख प्रा विद्या भेगडे व प्राध्यापक उपस्थित होते.

Bhosari News : भोसरी येथे गॅस चोरी करणाऱ्यास अटक

डाॅ तोटे म्हणाल्या, जगण्याला प्रेरणादायी व निरोगी विचार, आचार व  कृतीचे अनुष्ठान असायला हवे. विद्यार्थ्यांनी योग्य कृतीचा आग्रह धरत धाकाच्या चौकटीत आपल्या महाविद्यालयीन (Talegaon Dabhade) जीवनाला आकार देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मतांशी ठाम राहत अनेक आव्हानांचा स्विकार करून आपल्यात क्षमता वाढविण्याचा नेहमी प्रयत्न करायला हवा. त्यातून आत्मसन्मान, आत्मतेज आणि पर्यायाने ज्ञान वृध्दींगत होते. विद्यार्थ्यांनी स्वतःशी दयाळू राहून स्वतःशी वसकारात्मक संबंध प्रस्थापित करावे असेही डाॅ तोटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.