Talegoan Dabhade : खांडगे स्कूलमध्ये ‘मातृदिन’व ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘मातृदिन’ व ‘राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात ‘भारतमातेच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना मातृदिनाविषयी माहिती देण्यात आली. आईचे आपल्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर भारतमाता ही आपली जन्मभूमी आहे आपण नेहमी तिच्या रक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

आई आणि मुलाचे अतूट नाते व प्रेम यांचे दर्शन घडवणारी नाट्यछटा सादर करण्यात आली. आईची महती एका सुंदर कवितेतून विद्यार्थांना सांगण्यात आली. या दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थाने आपल्या आईविषयी दहा ओळी लिहून त्या तिला वाचून दाखवण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ‘फिट इंडिया’ हा कार्यक्रम दाखवण्यात आला.व सर्वाना फिट मुव्हमेंट ची सुरवात करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ,शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.