Talegoan : शंकरदादा दशरथ कुंभार यांचे निधन

एमपीसी न्यूज – .मावळ तालुक्यातील नामांकित पैलवान व भेगडे तालमीचे वस्ताद पै. शंकरदादा दशरथ कुंभार (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुलगे व ३ मुली असा परिवार आहे.

शंकरदादा कुंभार यांनी तळेगाव दाभाडे येथील डीआेडी या संरक्षण खात्याच्या डेपोत ४८ वर्षे विविध पदांवर काम केले होते. ते मावळ तालुक्यातील नामांकित पैलवान व भेगडे तालमीचे वस्ताद होते. तळेगावातील अनेक पैलवान (मल्ल) त्यांनी घडविले तसेच तळेगावातील २०१८च्या गुढीपाडव्याच्या आखाड्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

ते राष्ट्रीय सेवक संघाचे संघटक, डोळसनाथ उत्सव समितीचे माजी अध्यक्ष व खजिनदार तसेच सेवानिवृत्त संघटनेचे माजी अध्यक्षही होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.