Talegoan : शिवचारित्र्यातील विचारांचा स्वीकार केल्यास देशाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही : बाबासाहेब पुरंदरे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रातील विचारांचे अनुकरण व कृतित आणल्यास देशाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असे पमत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. 
छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान मावळ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘जाणता राजा’ महानाट्याचा उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मा. आमदार कृष्णराव भेगडे, आ. संजय (बाळा) भेगडे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जेष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, अंजली राजे दाभाडे सरकार, चंद्रसेनराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, सत्यशीलराजे दाभाडे सरकार, वृषालीराजे दाभाडे, शंकरराव शेलार, संजोग वाघेरे पाटील, रवींद्र दाभाडे, शंकराव शेळके, रवींद्र भेगडे, मयुर ढोरे उपस्थित होते. स्वागतपर मनोगत सुनील शेळके यांनी केले.

बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘शिवचारित्र्याचा आदर्श ठेवल्यास त्या राष्ट्राला वैभव, संपन्नता मिळाल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवनाचा आदर्शाचा सार म्हणजे शिवचरित्र आहे. प्रत्येकाने शिवचरित्राचे वाचन व आचरण करण्याची आज नितांत गरज आहे. शिवचरित्र हे जीवनाला मार्गदर्शक व दिशादर्शक आहे.’
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘जाणता राजा महानाट्यातून शिवचरित्राचा प्रसार व प्रचार होतो ही सामाजिक स्वास्थ्याकरिता अभिनंदनीय बाब आहे.’ या निमित्ताने महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा मावळ वासीयांच्या वतीने  नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजनाकरिता गिरीश खेर, राजेश सरोदे, युवराज काकडे, दिपक भेगडे, चिराग खांडगे, संजय बावीसकर, दीपक बिचे, गणेश निसाळ, हेमंत दाभाडे, अनुराग बोत्रे, विनायक भेगडे, गोकूळ किरवे यांनी सहकार्य केले.
प्रास्ताविक संतोष भेगडे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनया केसकर व सुरेश दाभाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.