Talegoan : डॉ.माधव देसाई यांचे दु:खद निधन

तळेगावातील सांस्कृतिक चळवळीची नोंद घेऊन संबंधित संस्थाना आर्थिक आणि मानसिक बळ देणारे

एमपीसी न्यूज – डॉ.माधव चंद्रकांत  देसाई यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.९ नोव्हेंबर २०१८ रोजी तळेगावातील जनरल हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशल युनिट मध्ये दु:खद निधन झाले.

डॉ.माधव देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण जर्मनीत झाले त्यांनी कायद्याची पण पदवी घेतली . त्यांचे वास्तव्य जर्मनी नंतर लॉस एन्जोलीस येथेपण होते. त्यांना संगीत कलेविषयी विशेष प्रेम होते आणि सामाजिक भान होते. ते श्रीरंग कलानिकेतन चे माजी उपाध्यक्ष होते आणि पैसा फंड मोफत वाचनालयाचे कार्यकारिणी विद्यमान सदस्य होते. त्यांनी तळेगावातील श्रीरंग कलानिकेतन, कलापिनी आणि पुण्यातील बालगंधर्व रसिक मंडळ यांना वेळोवेळी भरभरून आर्थिक सहाय्य केले होते. तसेच सुप्रसिद्ध गायिका सौ.आशाताई खाडिलकर यांच्या संस्थेसही त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केले होते

तळेगावात होणाऱ्या यांनी सर्व सांस्कृतिक आणि संगीतांच्या  कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असायचे. कलापिनीचा सौर विद्युत उर्जा प्रकल्प त्यांनी केलेल्या अर्थ सहाय्या मुळेच पुर्ण होऊ शकला. त्यांच्या निधनामुळे तळेगावातील सांस्कृतिक चळवळ सामाजिक भान असलेल्या, जाणकार रसिक आणि कलेची कदर करणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वास मुकली आहे. कलापिनी परिवार आणि श्रीरंग कलानिकेतन आणि तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीच्या वतीने त्यांना भावपुर्ण आदरांजली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.