Talegoan : ऋतुजा मुऱ्हे हिची राज्यस्तरीय ‘थ्रो बॉल’ स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – सोमाटणे येथील ऋतुजा संतोष मुऱ्हे हिची राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. नुकत्याच आत्मा मालिक क्रीडा संकुल अहमदनगर येथे विभागीय थ्रो बॉल स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेचा निकाल नुकताच जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर यांनी जाहीर केला असून यात मुलींच्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या खेळाडूची यादी प्रसिद्ध करण्यात आली. महाविद्यालयीन गटात ऋतुजा मुऱ्हे हिचे नावाचा समावेश असल्याने ऋतुजा तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ऋतुजा ही सध्या वाकड येथील इंदिरा इंटरनॅशनल महाविद्यालयात शास्त्र शाखेत बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या विजया जोशी यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

ऋतुजा हिला महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षक वैशाली यांचे मार्गदर्शन लाभले. तिला तिच्या या यशाबद्दल विचारले असता तिने सांगितले कि, जर एकाग्रतेने सराव केला तर समोर ठेवलेले लक्ष साध्य करता येते.

येत्या 5  ते 6 नोव्हेबर दरम्यान यवतमाळ येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ऋतुजा मुऱ्हे सध्या  कसून सराव सुरु असल्याचे तिचे वडील संतोष मुऱ्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like