Talegoan : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक मारुतीआप्पा भाऊ भेगडे यांचे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब आणि वारकरी संप्रदायातील मारुतीआप्पा भेगडे यांचे 25 सप्टेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कामात नेहमी सहभाग असायचा. पायी पंढरपूर यात्रेत त्यांचा सहभाग असे. खडकी येथील अँम्युनेशन फॅक्टरीमध्ये त्यांनी सुमारे 25 वर्षे सेवा केली. कामगार संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडा मालक संभाजी भेगडे व शिवाजी भेगडे यांचे ते वडील, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका उर्मिला भेगडे यांचे ते सासरे होत.

डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक वैभव भेगडे, युवा उद्योजक स्मितेष भेगडे, विशाल भेगडे, स्वराज भेगडे, विराज भेगडे यांचे ते आजोबा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.