Talegaon News : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी योगेश नाहटा यांची निवड

एमपीसी न्यूज – तळेगावमधील मारवाडी समाजातील कार्यकर्ते योगेश इंदरचंद नाहटा यांची अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

मारवाडी समाज हा अल्पसंख्याकमध्ये येतो, ओबीसी सेवा संघाने योगेश नाहटा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हणमंत सुतार यांनी दिले आहे.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब देडे, प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेश महिला अध्यक्ष निलोफर मुल्ला, प्रदेश कार्याध्यक्ष यशवंत पडळकर, प्रदेश खजिनदार नरेश बिरे, प्रदेश सचिव संतोष तायडे, प्रदेश सल्लागार पंढरीनाथ हजारे, प्रदेश सहसचिव प्रदीप कांबळे, प्रदेश संघटक अशोक गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नाहटा हे ओबीसी सेवा संघावर एक क्रियाशील कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून सर्व तळागाळातील अल्पसंख्यांक बांधवांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यास विशेष प्रयत्नशील असतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत.

आंबेडकर शाहू फुले यांचे विचार घेऊन पुढे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे, ओबीसी समाजासाठी चळवळ उभी करणे, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या संघटनाची जबाबदारी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे तसेच विविध प्रश्नांवर काम करून समाजातील लोकांना न्याय मिळवून देणे, शेतकरी प्रश्नांवर काम करणे, महापुरुषांचे विचार व कार्य समाजात पोहोचवणे इ. कामाची जबाबदारी नाहटा यांच्याकडे देण्यात आली आहे.

या निवडीमुळे मारवाडी अल्पसंख्यांक समाजातील तसेच इतर समाज स्तरातून नाहटा यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.