TalegaonDabhade : गणित-प्रबोध परीक्षेत ओंकार लोणसणे राज्यात तिसरा

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठातर्फे फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या गणित बाह्य परीक्षेत नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या शाळेतील कु ओंकार मुंजाजी लोणसणे याने (इयत्ता 9 वी) गणित- प्रबोध परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे, शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे साहेब व सचिव संतोष खांडगे यांनी ओंकारचे आणि त्याची उत्तम तयारी करून घेऊन मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ गणित अध्यापक सुदाम वाळुंज यांचे विशेष अभिनंदन केले.

ओंकारच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.