Talgaon Dabhade : मातीतील कुस्तीची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवावी- पवार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील पैलवान मातीच्या कुस्तीची परंपरा आणि प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीसह ऑलिंपिक स्पर्धेत राखतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. सोमाटणे येथील स्व.पै.मारूती माने, स्व.गणपत आंदळकर हिंद केसरी क्रीडानगरीत पद्मविभूषण लोकनेते पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सहकार्याने हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग, बाळासाहेब लांडगे, नानासाहेब नवले, मदन बाफना, कृष्णराव भेगडे, प्रदीप गारबटकर, मारुती आडकर, विलास लांडे, विजय बराटे, हनुमंत गावडे, बबनराव भेगडे, चंद्रकांत सातकर, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, सुनील शेळके, दिलीप बराटे, बाबूराव वायकर, काका पवार, अशोक बराटे, बाला शेख, व्ही.एन.प्रसुद, भोलानाथ सिंग, कर्तार सिंग, जयप्रकाश पैलवान, एस.पी.जस्वाल, एन.फोनी, जगादास कुमार, नटसिंग राव आदी उपस्थित होते.

देशभरातील 24 राज्यातील 190 मल्ल मातीवरील कुस्तीत सहभागी झाले आहेत. सेनादल, रेल्वे दलातील मल्लांच्या ही मातीतील लढती देणार आहे. लाल मातीत होणारी देशातील राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा आहे.

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष, खासदार ब्रिजभूषण सिंग म्हणाले, ” पवार और हमारा दल अलग है, लेकिन दिल एक हैं! पवारांनी कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली. लाल मातीतील ही कुस्ती ऑलिम्पिक मध्ये लवकरच पोहोचेल. या स्पर्धेची नोंद इतिहासात घेतली जाईल कारण देशातील ही पहिली स्पर्धा आहे ” पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

एकापेक्षा एक अधिक सरस ठरलेल्या कुस्तींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले, हलगीच्या ठेक्यावर पैलवानांसह प्रेक्षकांमध्ये चैतन्य संचारत होते. बाबाजी लिमण, विकास वाजे, कृपा शंकर सिंग यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ, बाबाजी सातव, अशोक कुमार, महावीर, सत्तव्रत काभियान, सत्यवान, राजकुमार आदींनी पंच म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.