Talwade : घरात घुसून लहान मुलाचा गळा आवळत केला चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – चोरट्याने थेट घरात घुसून लहान मुलाचा गळा आवळून दागिने, पैशाची मागणी केली. त्या चोरट्याला अडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर त्याने शस्त्राने वार करून धूम ठोकली. ही घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी तळवडे (Talwade) येथे घडली.

भास्कर विश्वनाथ मेमाणे (वय 41, रा. तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : कवी वादळकार यांच्या ‘प्रेम क्लिनिक’ या थिएटर शोचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेमाणे हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात पूजा करीत होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या भावाने चोर-चोर असा जोरात आवाज दिला. मेमाणे यांनी बाहेर जाऊन पाहिले असता त्यांच्या भावाच्या मुलाच्या गळ्याला पकडून एकजण दागिने आणि पैशांची मागणी करत होता. मेमाणे हे त्या व्यक्तीला अडविण्यासाठी गेले असता त्याने मेमाणे यांच्या पोटात बुक्की (Talwade) मारून शस्त्राने वार करून जखमी केले. त्यानंतर अनोळखी व्यक्ती पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.