Talwade News : व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – प्लॉटींगच्या व्यावसायातून (Talwade News)  खूप पैसे कामावलेस, मी इथला भाई आहे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत 78 हजार रुपये खंडणी घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मार्च 2023 या कालावधीत ओम लँड डेव्हलपर्स तळवडे येथे घडली.

 

 

सुधीर सोपान जाधव असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप उर्फ संजय आनंदा काळोखे (वय 40, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

Pune News : ‘त्या’ पराभवामुळे शिंदे फडणवीस सरकारला पुण्याच्या मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा लागला – रविंद्र धंगेकर

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. सुधीर जाधव याने फिर्यादी यांना धमकी दिली. तू प्लॉटिंग व्यवसायात भरपूर पैसा कमावला आहे. माझ्यावर खून, बलात्काराची केस असून मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे.

 

तुला व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे दिले नाहीत तर जीवे मारीन, अशी सुधीर याने फिर्यादीस धमकी दिली. फिर्यादींकडून 38 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर पुन्हा 50 हजार रुपयांची मागणी करून जबरदस्तीने 40 हजार रुपये काढून घेतले. पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत (Talwade News) आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.