Talwade News : त्रिवेणी नगर येथील श्रीमती एस डी गणगे प्रशाला येथे प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – श्रीमती एस डी गणगे प्रशाला त्रिवेणी नगर तळवडे येथे 74 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात (Talwade News ) आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उत्तम भालेकर, प्रमुख पाहुणे रविंद्र कांबळे (माजी सैनिक), अरविंद कांबळे (उद्योजक) , रुचिता विशाल गरड पाटील, नगरसेविका संगीता  ताम्हाणे, माजी नगरसेवक सुरेश  म्हेत्रे, साई कम्प्युटर चे मातने सर, माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक सुजीत तांबोळी, संस्था संचालक काशिनाथ जाधव, माणिक म्हेत्रे (समाजसेवक, निवेदक), प्रभाकर  ताम्हाणे (समाजसेवक), शिक्षक पालक समिती सदस्य, आजी – माजी पालक, माजी विद्यार्थी बहुसंख्य उपस्थितीत हजर होते. प्राचार्य सुभाष तिकटे , प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका गवस, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका होनकळसे आदी उपस्थित होते.

Pune News : श्री साई सेवा संस्था च्या गतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

साऊ जिजाऊ जन्मोत्सव अंतर्गत पुरस्कार वाटप, दहावी परीक्षेत (मार्च2022) उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी – ओमकार प्रभाकर शिंदे, समृद्धी बाळासाहेब वावरे, साक्षी हणमंत खंडागळे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी सुशांत संजय आवळेकर (8वी), सुजल संजय आवळेकर व अभिनंदन महादेव वाघिरे (5 वी) व क्रीडा विभागातील यशस्वी खेळाडू पारितोषिक वितरण करण्यात आले. बाल सभेमध्ये पूर्वप्राथमिक ते माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी  गीत, संगीत, नृत्य, मूकाभिनय व मनोगते यांनी सोहळा रंगवला.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य तिकटे सर यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रकांत अंबुरे  तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पद्मश्री परीट, रमेश बुद्रुक, महादेव फपाळ, बाबासाहेब गव्हाणे, दसवंत , आकाश हगवणे, उमा गिरी इत्यादींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.