Talwade : खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ तळवडे भागात पदयात्रा 

एमपीसी  न्यूज –  आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, महायुतीचे शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी तळवडे गावठाण परिसर पिंजून काढला.

यावेळी  आशा दयानंद भालेकर,. सुखदेव अप्पा नरळे, धनंजय वर्णेकर, शांताराम भालेकर, रमेश  भालेकर, संतोष नखाते, सोमनाथ मेमाणे, किसन आदिवाल, सागर भालेकर आदींनी या पदयात्रेत सहभाग घेतला.

ही पदयात्रा स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेली विकासकामांचा आढावा असणारी पत्रके यावेळी नागरिकांनी देण्यात येत आहेत. उमेदवारांनी प्रभागांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अडीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका आहेत. त्यासाठी पदयात्रा, गाढीभेटी करुन उमेदवाराचा प्रचार घरोघरी  करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.