Talwade : ज्योतिबानगर, तळवडे भागातील इंडस्ट्रीज भागात वृक्षारोपण

स्विकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्विकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे, ज्योतिबानगर भागातील इंडस्ट्रीज भागात वृक्षारोपण करण्यात आले.

चिखली भागातील चंद्रभागा गोशाखा गोसंवर्धन संस्था याठिकाणी गोमातेसाठी चारा देण्याचे काम आणि रुपीनगर भागातील किनारा वृध्दाश्रम येथे फळे, तेल डब्बा, धान्य वाटप करण्यात आले. संध्याकाळी रहात्या घरासमोर शिवप्रतिमा पूजन करुन शिववंदना केली.

  • यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, दीपक भालेकर, सोमनाथ मेमाणे, बाळासाहेब म्हेत्रे, शाम भालेकर, बाळासाहेब भालेकर, रामदास कुटे, जगन भालेकर, रोहिदास भालेकर, सचिन भालेकर, सागर भालेकर, किरण घेनंद, दिगंबर भालेकर, किशन आदिवाल, सतीश भालेकर, सचिन भालेकर, संभाजी वाघमारे, राहूल घोलप, माणिक धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.