Talwade Triveni Nagar : चेंबरची लोखंडी झाकणे चोरून नेणारे ‘सीसीटीव्ही’त कैद!

एमपीसी न्यूज – तळवडे-त्रिवेणीनगर (Talwade Triveni Nagar) या रहदारीच्या मार्गावरील चेंबरची लोखंडी झाकणे चोरून नेणारे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. टेम्पोतून दोन चोरटे येतात. इकडे-तिकडे बघतात आणि झाकण उचलून टेम्पोत टाकून घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

तळवडे-त्रिवेणी नगर रहदारीच्या (Talwade Triveni Nagar) मार्गावरील चेंबरची लोखंडी झाकणे गायब होत आहेत. त्यामुळे हे उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत. सतत वाहनांची आणि माणसांची वर्दळ असणाऱ्या या मार्गावर शाळा, दुकाने, इंडस्ट्री, हॉस्पिटल आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नारिकांपर्यंत सर्वजण या मार्गावरून दररोज जात असतात. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील चेंबरची झाकणे गायब होत आहेत. ही झाकणे महापालिका कर्मचारी दुरुस्तीसाठी नेतात की चोरीला जातात? असा सवाल करत ‘एमपीसी न्यूज’ने वृत्त प्रसारित केले होते.

Talwade Triveni Nagar : तळवडे त्रिवेणी नगर मार्गावरील उघडे चेंबर देत आहेत अपघाताला निमंत्रण

त्यानंतर ‘एमपीसी न्यूज’चे वाचक नरेंद्र भालेकर यांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले. दोघेजण टेम्पोतून येत आहेत. चेंबरच्या जवळ टेम्पो थांबवतात. चालक अगोदर खाली उतरतो. त्यानंतर पाठीमागे बसलेली व्यक्ती खाली उतरते. थोडावेळ इकडे-तिकडे बघतात आणि चटकन झाकण उचलून टेम्पोत टाकून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही’त कैद झाले आहे.

याबाबत माहिती देताना महापालिका कनिष्ठ अभियंता योगेश आल्हाट म्हणाले, “चेंबरचे लोखंडी झाकण चोरीला जाण्याची घटना दोनवेळा घडली आहे. 5 आणि 19 सप्टेंबर पहाटे चोरी झाली आहे. लोखंडी झाकण चोरून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. याची सविस्तर चौकशी करावी आणि चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निगडी पोलिसांकडे केली आहे. त्याबाबत लेखी अर्ज पोलिसांना दिला आहे. पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करतील”.

Misbehave of PMPML Conductor : पीएमपीएमएलच्या कंडक्टरची आरेरावी, प्रवासी तरुणीचे ओढले केस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.