Corona Update: कोरोना विषाणूमुळे आमदाराचा मृत्यू

Tamil Nadu DMK MLA J Anbazhagan who was suffering from COVID19 passes away in Chennai कोविड-19 मुळे त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांची स्थिती गंभीर झाली होती. आज पहाटे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

एमपीसी न्यूज- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूमुळे द्रमुकच्या आमदाराचे निधन झाले आहे. द्रमुक आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी (दि.10) सकाळी निधन झाले. दि.2 जूनपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी अंबाजगन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

खासगी रुग्णालय डॉ. रेला इन्सिट्यूट अँड मेडिकल सेंटरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 मुळे त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांची स्थिती गंभीर झाली होती. आज पहाटे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. योग्य त्या वैद्यकीय सुविधा देऊनही त्यांना वाचवता आले नाही.


द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी आपल्या आमदारांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. अंबाजगन हे किडनीशी संबधित आजाराने पूर्वीपासूनच ग्रस्त होते.

त्यांना 3 जून पासून व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नव्हती. सोमवारपासून त्यांची तब्येत आणखी ढासळली होती. वैद्यकीय पथकाकडून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. अखेर त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.