_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Tanzanite Gemstones: अचानक सापडलेल्या मौल्यवान दगडामुळे खाणकामगार झाला लक्षाधीश

Tanzanite Gemstones: A miner became a millionaire due to the sudden discovery of a precious stone टांझानिया हा आफ्रिकेतील असाच एक देश. पण तिथे एक मूल्यवान रत्न सापडते जे जगात इतरत्र कुठेच सापडत नाही.

एमपीसी न्यूज- हिरे किंवा विविध मौल्यवान रत्नं म्हणजे खरं तर कार्बनची विविध रुपे असतात. सोप्या भाषेत कार्बन म्हणजे कोळसा. आपल्या मराठीत म्हणच आहे की हिरे हे कोळशाच्या खाणीतच सापडतात. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या स्थानी वेगवेगळी मौल्यवान रत्नं सापडतात. काही रत्नं फक्त ठराविक ठिकाणीच सापडतात. त्यामुळे ती आणखी जास्त मूल्यवान ठरतात. जगभरात प्रामुख्याने आफ्रिकेत ही रत्नं अनेक ठिकाणी सापडतात.

टांझानिया हा आफ्रिकेतील असाच एक देश. पण तिथे एक मूल्यवान रत्न सापडते जे जगात इतरत्र कुठेच सापडत नाही. चमकदार निळ्या रंगाचे असणा-या रत्नाचे नाव टांझानियावरुन ‘टांझानाइट’ असे ठेवण्यात आले आहे.

फक्त टांझानियामध्येच या रत्नाच्या खाणी आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. काही दिवसांपूर्वी या खाणीमध्ये उत्खनन करताना एका खाणकामगाराचे भाग्य अचानकपणे फळफळले.

टांझानियामधील एका खाणीत एका खाणकाम करणार्‍याला चक्क दोन मोठे टांझानाइटचे दगड मिळाले. यांची विक्री केल्यानंतर तो एका रात्रीत लक्षाधीश बनला आहे. सनीन्यू लायझर या खाणकामगाराने शोधलेला हा जगातील आजवरचा सर्वात मोठा टांझानाइट आहे.

लायझर यांनी 2.2 किलो व 8.8 किलो वजनाच्या दगडांचे उत्खनन केले, त्या त्याने बुधवारी मोनियाराच्या उत्तर भागात एका व्यापार कार्यक्रमात विकल्या.

_MPC_DIR_MPU_II

या व्यवहारानंतर लायझर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ‘उद्या एक मोठी पार्टी होईल.’ 30 मुलांचे वडील आणि चार बायकांचे पती असलेल्या लायझर या व्यवहारामुळे प्रचंड खूश आहेत.

ते स्वत: अशिक्षित आहेत पण मोनियारा येथील सिमांजिरो जिल्ह्यात आपल्या समाजात गुंतवणूक करण्याचीही त्यांची योजना आहे. ‘मला एक शॉपिंग मॉल आणि एक शाळा बांधायची आहे.

मला ही शाळा माझ्या घराजवळ बांधायची आहे. आजूबाजूला असे बरेच गरीब लोक आहेत. ज्यांना आपल्या मुलांना शाळेत नेणे परवडत नाही. मी शिक्षित नाही. परंतु, मला व्यावसायिक गोष्टी चालवण्यास आवडतात. म्हणून माझ्या मुलांनी व्यवसाय केलेला मला आवडेल’, असे लायझर यांनी या निमित्ताने सांगितले.

टांझानाइट फक्त उत्तर टांझानियामध्ये आढळते आणि दागदागिने तयार करण्यासाठी वापरले जाते. नीलम हे रत्न देखील निळेच असते. पण नीलम आणि टांझानाइटमध्ये फरक आहे.

नीलम त्या मानाने मोठ्या प्रमाणावर मिळते. मात्र टांझानाइट पृथ्वीवरील सर्वात दुर्मीळ रत्नांपैकी एक आहे आणि येत्या 20 वर्षांत त्याचा पुरवठा पूर्णपणे कमी होईल, असा स्थानिक भूगर्भशास्त्रज्ञाचा अंदाज आहे.

या रत्नाचे मूल्य दुर्मीळतेद्वारे निश्चित केले जाते. रंग किंवा स्पष्टता जितकी बारीक असेल तितकी किंमत जास्त असते. आतापर्यंत खाणीतील सर्वांत मोठ्या टांझानाइट खडकाचे वजन 3.3 किलो होते. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी फोनवरुन लाऊझर यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.