Pune : खडकवासल्यात शेवटपर्यंत तापकीर – दोडके यांच्यात झुंज : अखेर 2100 मतांनी तापकीर विजयी

एमपीसी न्यूज – खडकवासल्यात शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार, नगरसेवक सचिन दोडके आणि आमदार भिमराव तापकीर यांच्यात विजयासाठी झुंज पाहायला मिळाली. अखेर तापकीर यांनी 2100 मतांनी विजय मिळविला. तापकीर यांना 1 लाख 18 हजार 627, सचिन दोडके यांना 1 लाख 16 हजार 512 मते मिळाली. दरम्यान, दोडके यांनी मतमोजणी होण्यापूर्वीच मतदारसंघांत विजयाचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात झळकविले होते. त्यामुळे खमंग चर्चांना उत आला होता. तर, आज दोडके यांचा केवळ 2100 मतांनी पराभव झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.