Tapasee’s Mischivous Mood: तापसीने शेअर केला खट्याळ मूडमधील थ्रोबॅक फोटो

Tapasee's throwback photo in a mischievous mood लहानपणीही आपले मिलियन डॉलर स्माइल दाखवणारी तापसी कॅमे-याला मस्त पोज देत आहे.

0

एमपीसी न्यूज- सध्या शुटिंग, डबिंग वगैरे बंद असल्याने सेलिब्रेटी घरातच आहेत. त्यामुळे सगळे सध्या सोशल मीडियावर बिझी आहेत. जुन्या आठवणी जागवण्यासाठी अनेकजण सध्या थ्रोबॅक फोटो पोस्ट करण्यात मग्न आहेत. तसेच आपल्यातील इतर गुणवैशिष्टांची फॅन्सना ओळख करुन देण्याची चढाओढ लागली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आपले असेच काही जुने फोटो फॅन्ससाठी पोस्ट करत असते. फॅन्सना काय आवडेल याची तिला चांगली जाण आहे.

नुकताच तापसीने असाच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत छोटी तापसी आपली छोटी बहीण शगुन आणि आई यांच्यासह दिसत आहे.

लहानपणीही आपले मिलियन डॉलर स्माइल दाखवणारी तापसी कॅमे-याला मस्त पोज देत आहे. मात्र तिची बहीण शगुन इकडे तिकडे बघत आहे आणि आई या खोडकर दोघींना सांभाळण्यात मग्न आहे.

या खट्याळ फोटोवर तापसीने तितक्याच खट्याळ ओळी शेअर केल्या आहेत. ती म्हणते, ‘शगुन म्हणते- माझा का फोटो काढताय ? मी तापसी म्हणतेय- आय एम रेडी, आणि आई म्हणतेय- या दोघींना एकाच फ्रेममध्ये ठेवण्यासाठी कोणी मला बक्षीस देईल का ?’

मागील वर्ष तापसीसाठी खूप चांगले गेले. तिच्या एकाच वर्षी चार फिल्म रिलीज झाल्या होत्या. ‘थप्पड’ या तिच्या थोड्या महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या फिल्मने देखील चांगले नाव कमावले.

तिने यंदादेखील अनेक फिल्म साईन केल्या आहेत. तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’, ‘रश्मी रॉकेट’, क्रिकेटर मिताली राजची बायोपिक आणि अनुराग कश्यपची अपकमिंग फिल्म आणि ‘रन लोला रनचा’ रिमेक या आगामी फिल्म आहेत. ‘हसीन दिलरुबा’चे शूटींग ती हरिद्वार येथे करत होती. पण कोरोनाच्या उद्भवामुळे ते शुटिंग रद्द करुन सगळी टीम मुंबईत परत आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like