_MPC_DIR_MPU_III

Tapi Crime News : पहाटे झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू;  अनेक वऱ्हाडी जखमी

एमपीसी न्यूज – गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

अपघात इतका भीषण आहे की यात अर्धी खासगी लक्झरी बस कापली गेली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी की, मालेगावहून एक मुस्लीम कुटुंबीय काल (दि ०४) रात्री हजार खोली परिसरातून सुरतकडे लग्नासाठी निघाले होते. आज दुपारी हे लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीच्या खासगी बसला आज पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात अपघात झाला.

_MPC_DIR_MPU_II

भरधाव असेलली लक्झरी बस एका पार्क केलेल्या ट्रकला जाऊन आदळली. या घटनेत बस अर्ध्यापर्यंत कापली गेली आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सात गंभीर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वालोद गावाजवळ व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. लक्झरी बस महाराष्ट्रातील मालेगाव ते दक्षिण गुजरातमधील सुरत येथे एका लग्नाच्या पार्टीत होती, अशी माहिती वालोद पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. आर. वासावा यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.