Mumbai: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

Taskforce in all districts of the state to prevent the spread of corona, Medical expert doctors as well as other related bodies वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर तसेच अन्य संबंधित यंत्रणा यांचा समावेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोविड -19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे  टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत.  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर तसेच अन्य संबंधित यंत्रणा यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार असून कोविड -19  नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार , उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स  काम करेल.  जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत काळविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री  देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.

राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.