Tata 407 :  टाटाचा 407 आता ‘सीएनजी’वर, माफक किमतीचे ‘सीएनजी’ मॉडेल लॉन्च

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या ‘गो ग्रीन’च्या ताफ्यात आणखी एका वाहनाचा समावेश झाला आहे. या वेळी हे वाहन कार नसून प्रसिद्ध 407 टेम्पो आहे. टाटाने आपल्या नवीन वाहन रेंजमध्ये नवीन 407 ‘सीएनजी’ मॉडेल लॉन्च केले आहे.

विशेष म्हणजे नवीन मॉडेलची सुरवातीची किंमत अवघी 12.07 लाख एवढी ठेवण्यात आली आहे. 407 चे ‘सीएनजी’ मॉडेल डिझेल 407 च्या तुलनेत 35 टक्के जास्त फायदेशीर ठरणार आसल्याचे टाटाने म्हटले आहे.

टाटा मोटर्सच्या ईलेक्ट्रिक वाहनांमध्ये नेक्सन आणि टिगॉर या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता मालवाहू वाहनांमध्ये टाटाने नवीन 407 सीएनजी लॉन्च करून ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सीएनजी 407 ला 3.8 लिटर सीएनजी इंजिन असून ते, 85 पीएस एवढी शक्ती निर्माण करेल. याची 180 लिटर एवढी इंधन क्षमता आहे.

नवीन 407 ला सेमी फॉरवर्ड कन्ट्रोल केबिन असून हायग्रेड स्टीलपासून ते बनवले आहे. टेम्पोला पॅराबोलिक सस्पेन्शन आहे. केबिनमध्ये युएसबी केबल, मोबाईल चार्चिंग सुविधा आणि म्युझिक सिस्टिम जोडण्यात आली आहे. 407 ला तीन वर्षे किंवा तीन लाख किलोमीटर एवढी वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ग्राहकाला ‘संपूर्ण सेवा 2.0’ या पॅकेजअंतर्गत मेन्टेनन्स सेवा देईल, असे टाटाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

उत्पादन लाइनचे उपाध्यक्ष रुद्ररुप मैत्र म्हणाले, ‘मागील 35 वर्षांपासून 407 हे ग्राहकांचे विश्वासाचे वाहन राहिले आहे. याच वाहनाचे सीएनजी मॉडेल लॉन्च करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. डिझेल किंमती वाढल्याने ग्राहकांना परवडणारी किंमत आणि सीएनजीवर चालणारे वाहन अधिक फायदेशीर ठरणार आहे.’

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.