Tata Buisness News : टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची पसंती, आजअखेर 2,200 कारची विक्री

एमपीसी न्यूज – भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली. सध्या भारतीय बाजारात टाटाची सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सॉन इलेक्ट्रिक कार (Tata Nexon electric car) बाजी मारताना दिसत आहे. ही कार बाजारात आल्यापासून नोव्हेंबर अखेर 2,200 कारची विक्री झाली आहे.

टाटा मोटर्सने आपली सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सॉनला या वर्षीच्या सुरुवातीला लाँच केले होते. आता वाहन विक्रीत ही कार सर्वात पुढे आहे.

टाटा नेक्सॉनची नोव्हेंबर अखेर 2,200 युनिटची विक्री झाली आहे. त्यापैकी 1000 युनिटस् मागील तीन महिन्यात विकले आहेत. भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारातील एकूण 74 टक्के भाग हा नेक्सॉनकडे आहे.

‘आमचे कामगार आणि आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये नेक्सॉनला पसंती दिली जात आहे. झिरो उत्सर्जन, आरामदायी ड्राईव्हिंग अनुभव आणि आकर्षक किंमत यामुळे नेक्सॉन ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याची भावना प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा (Shailesh Chandra, President, Passenger Vehicle Business) यांनी व्यक्त केली आहे.

ऑटो कंपन्या एका पाठोपाठ एक इलेक्ट्रिक कार लाँच करीत आहे. परंतु, टाटाची विश्वासाहर्ता आणि आकर्षक किंमत यामुळे नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीला ग्राहक पसंती देत आहेत. ही कार तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312 कि.मी पर्यंत धावू शकते. या कारवर 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी आणि IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश आहे. नेक्सॉनला चार्जिंग करण्यासाठी केवळ 60 मिनिट लागतात. ही कार शून्य ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जावू शकते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.