Tata Buisness News : टाटा मोटर्सची ‘मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिका’ लाँच

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने ‘मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिका’ लाँच केली आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली आहे. आरोग्यसंबंधित वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ही रुग्णवाहीका खास तयार करण्यात आली आहे.

कोविड-19 साथीच्या काळात रुग्णवाहिका सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी ती उपयुक्त आहे. रुग्ण आणि रुग्ण सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका डिझाइन करण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या एससीव्ही अँड पीयू उत्पादन श्रेणीचे उपाध्यक्ष विनय पाठक म्हणाले, ‘मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिका लॉन्च करून टाटा मोटर्सने सर्वोत्तम आरोग्य वाहतूक सुविधा पुरवण्याचा आपला वायदा पूर्ण केला आहे. परिपूर्ण रुग्ण वाहिका तयार करण्यासाठी टाटा मोटर्स वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम करत होती.

रुग्णांच्या आवश्यक लक्षात घेऊन टेलर-मेड वाहन आम्ही निर्माण केलं आहे. आरोग्यसेवा उत्पादनांची विस्तृत श्रेणी पुरवणारी टाटा मोटर्स ही देशातील एकमेव उत्पादक कंपनी आहे. मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स आणि टाटा विंग अँब्युलन्स या रुग्णवाहिका वाजवी किंमतीत विविध वैद्यकीय गरजांची पूर्तता करतात. यामध्ये मूलभूत जीवनरक्षक, प्रगत जीवनरक्षक आणि मल्टि-स्ट्रेचर 410/29 अँब्युलन्सचा समावेश आहे.

मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स ही ऑटो-लोडिंग स्ट्रेचर, मेडिकल कॅबिनेट, ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था, डॉक्टरांसाठी आसन व अग्निशमन व्यवस्थेसारख्या अत्यावश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे. शिवाय अंतर्गत प्रकाशयोजना, आगप्रतिबंधक अंतर्गत रचना आणि उद्घोषणेची व्यवस्थाही या रुग्णवाहिकेत आहे.

ही रुग्णवाहिका एआयएस प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टिव डेकल्स आणि सायरनसह बेकन लाइटने सुसज्ज आहे.

चालकाचा आणि रुग्णाचा भाग पार्टिशन घालून वेगळा करण्यात आला आहे. विशेषत: कोविड- 19 रुग्णांची वाहतूक करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. रुग्णवाहिकेला सर्वोत्तम दर्जाचे 800 सीसी टीसीआयसी इंजिन आहे. हे इंजिन 44 हॉर्सपॉवर ऊर्जा व 110 एनएम टॉर्क निर्माण करते.

मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिकेमध्ये अत्यंत यशस्वी असा मॅजिक प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. भारतातील दुर्गम भागातील सार्वजनिक वाहतूकीसाठी हा प्लॅटफॉर्म गेल्या 13 वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. टाटा मोटर्सचे ‘पॉवर ऑफ सिक्स’ तत्त्वज्ञान ध्यानात ठेवून टाटा मॅजिक रुग्णवाहिकांचे इंजिनीअरिंग डिझाईन तयार करण्यात आले आहे.

वाहनांची कामगिरी दमदार असून, ड्रायव्हिंग आरामशीर आहे‌. रुग्णवाहिका बाळगण्याचा एकूण खर्च टीसीओ अर्थात टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप तुलनेने कमी आहे.

मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिका रुग्णालये, नर्सिंग होम्स, सरकारी आरोग्य खाती, आरोग्यविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा भारतीय आरोग्यसेवा परिसंस्थेचा भाग असलेल्या स्टार्टअप्स यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. टाटा मोटर्स एससीव्ही प्रवासी श्रेणीतील वाहनांना दोन वर्षे / 72 हजार किलोमीटर्सची वॉरंटी आहे.

  रुग्णवाहिकेची ठळक वैशिष्ट्ये –

– रुग्णवाहिका प्रवर्गासाठी सरकारने घालून दिलेल्या एआयएस 125 नियमांची पूर्तता करते

– शहरातील ड्रायव्हिंगची स्थिती लक्षात घेऊन आटोपशीर आकारमान आणि हलवण्यास सुलभ

– रुग्ण आणि चालक यांच्या शिवाय अन्य पाच सहाय्यकांना सामावून घेण्याची क्षमता

– विक्री नंतर संपूर्ण सेवा 2.0 च्या माध्यमातून सेवेची हमी आणि टाटा समर्थ कार्यक्रमाखाली चालकाला देखील लाभ

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.