Tata Business News : टाटा मोटर्सचा ‘सिग्ना 3118 T’ लॉन्च

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने मध्यम आणि जड वाहतूक वाहनांच्या श्रेणीत टाटा सिग्ना 3118 T हा नवीन ट्रक लॉन्च केला आहे. तीन एक्सल व 6 बाय 2 दहा चाकी असलेला हा भारतातील पहिला ट्रक आहे. या ट्रकचे संपूर्ण वजन 31 टन एवढं आहे. 28 टन वजनी ट्रकच्या तुलनेत हा ट्रक 3500 किलो ज्यादा भार वाहून नेऊ शकतो.

टाटा सिग्नामध्ये क्‍यूमिन्स बीएस 6 इंजिनचा वापर करण्यात आला आहे. ज्याद्वारे 186 हॉर्स पॉवर निर्माण केली जाते, तर 850 एनएम एवढा टॉर्क निर्माण केला जातो.

टाटा सिग्‍ना जी-950 सहा स्पीड ट्रांसमिशन आणि हेव्ही ड्यूटी एक्सेल्स यांची एकत्रित मदत होईल याचा विचार करून डिझाईन करण्यात आला आहे. या ट्रकला सहा वर्षे किंवा सहा लाख किलोमीटर प्रवास एवढी वॉरंटी देण्यात आली आहे.

नवीन टाटा सिग्ना खुप फायदेशीर असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना कमी खर्चात मोठा लाभ मिळेल. मोठ्या पल्ल्याच्या जड वाहतूकीसाठी हा ट्रक तयार करण्यात आला आहे. ज्यातून कृषी, पेट्रोलियम, खाद्यपदार्थ यासह इतर जड सामानाची वाहतूक केली जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.