Tata Launches New Truck : ‘सिग्‍ना 4825 टीके’ टाटाने लॉन्च केला भारतातला सर्वात मोठा टिपर ट्रक

एमपीसी न्यूज –  टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने कोळसा व बांधकामाच्‍या जमिनी परिवहनासाठी भारतातील पहिला 47.5 टन मल्‍टी- अ‍ॅक्‍सल टिपर ट्रक ‘सिग्‍ना 4825 टीके’ लॉन्च केला आहे. 16 चाकी असलेला या ट्रकचे वजन 47.5 टन आहे. या ट्रकची 29 घन मीटर क्षमता असलेली ट्रॉली अधिक वजनाचा भार घेऊन जाण्‍यासाठी सक्षम आहे. 

टाटा मोटर्सच्‍या पॉवर ऑफ 6 या तंत्रज्ञानाचा वापर करून हा ट्रक विकसित करण्यात आला आहे. ग्राहकांची उच्‍च उत्‍पादकता आणि जलद फे-या मारण्‍याची गरज लक्षात घेऊन या ट्रकचे डिझाइन तयार करण्‍यात आले असून हा ट्रक सुधारित कार्यक्षमता, उच्‍च पेलोड क्षमता तसेच  ड्रायव्‍हरसाठी उच्‍च आरामदायी सुविधा व सुरक्षा यांची खात्री देतो.

सिग्‍ना 4825 टीके या ट्रकमध्‍ये कमिन्‍स आयएसबीई 6.7 लिटर बीएस 6 प्रमाणित इंजिन आहे. हे इंजिन 250 एचपी’ची उच्‍च शक्‍ती आणि 1000 ते 1700 आरपीएममध्‍ये 950 एनएम टॉर्क देते. ज्‍यामुळे जलद गतीने अधिक फे-या मारल्या जाऊ शकतात. या शक्तिशाली इंजिनमध्‍ये अत्‍याधिक व टिकाऊ जी 1150 नऊ स्‍पीड गिअरबॉक्‍ससह 430 मिली मीटरचा डाय ऑर्गेनिक क्‍लच आहे. जमिनी वाहतूकीसाठी या गिअरचे प्रमाण डिझाइन करण्‍यात आले असून हा ट्रक इंधनाचा कमी वापर करतो.

टिपर ट्रकमध्‍ये लाइट, मेडियम व हेवी असे तीन वैशिष्‍ट्यपूर्ण ड्राइव्‍ह मोड्स आहेत. ज्‍यामधून उच्‍च भार व वाहतूक प्रदेशानुसार अधिकतम शक्‍ती व टॉर्कचा वापर होण्‍यासोबतच उच्‍च इंधन कार्यक्षमता मिळते. या ट्रकची 29 घन मीटर टिपर बॉडी व हायड्रॉलिक्‍स हे कारखान्‍यातच तयार करण्यात येते व रेडी टू युज अशा प्रकारे ग्राहकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात  आले आहेत. सिग्‍ना 4825 टीके ग्राहकांना त्‍यांच्‍या आवश्‍यकतेनुसार 10*4 व 10*2  या दोन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

‘सिग्‍ना 4825 टीके’ ची ठळक वैशिष्‍ट्ये:

  • वाहनाचे एकूण वजन 47.5 टन,जे देशातील कोणत्‍याही टिपर ट्रक्‍समध्‍ये सर्वोच्‍च
  • प्रबळ टिकाऊपणा व विश्‍वसनीयतेसाठी जगप्रसिद्ध 6.7 लिटर कमिन्‍स इंजिनची शक्‍ती
  • अद्वितीय 6 वर्षे व 6 लाख किलोमीटर अंतरापर्यंतची वॉरण्‍टी
  • उद्योगक्षेत्रातील पहिल्या कारखान्‍यामध्‍ये बसवण्‍यात आलेल्‍या प्रगत इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणेसह टिपिंगच्‍या वेळी संभाव्‍य कोसळण्‍याचे निदान व प्रति‍बंध करण्‍यासाठी सेन्‍सर्स
  • हिल स्‍टार्ट असिस्‍ट, 3 मोड फ्यूएल इकोनॉमी स्विच, फ्लीट एज आणि उद्योगक्षेत्रातील अनेक पहिली वैशिष्‍ट्ये

टाटा मोटर्सच्‍या प्रॉडक्‍ट लाइन, एम अ‍ॅण्‍ड एचसीव्‍हीचे उपाध्‍यक्ष आरटी वासन सिग्‍ना 4825 टीकेच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना असे म्‍हणाले की, टाटा मोटर्सने बीएस-6 अंमलबजावणी करत उत्‍सर्जन नियमांना आत्‍मसात करण्‍यासोबत संपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ अद्ययावत करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. ज्‍यामुळे कामगिरी, कार्यसंचालन क्षमता, आरामदायी सुविधा व सुरक्षे बाबत नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता केली आहे.  बांधकाम व कोळसा उद्योगक्षेत्रातील ग्राहकांच्‍या गरजांना जाणून घेत सिग्‍ना 4825 टीके सादर करण्‍याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

वासन पुढे म्हणाले की, सिग्‍ना 4825 टीके हा 47.5  टन असलेला भारताचा सर्वात मोठा टिपर ट्रक  आहे. देशाच्‍या सर्वसमावेशक गरजा व मागण्‍यांची पूर्तता करणारे सर्वोत्तम उत्‍पादन वितरित करण्‍याचा आमचा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. आमच्‍या पॉवर ऑफ 6 तत्त्वाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही उद्योगक्षेत्रातील अग्रणी उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याचे कार्य सुरूच ठेवले असून कार्गो व कन्‍स्‍ट्रक विभागांमधील आमची उपस्थिती अधिक प्रबळ करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या ट्रकमध्‍ये एैसपैस स्‍लीपर केबिन, टिल्‍ट अ‍ॅण्‍ड टेलिस्‍कोपिक स्टिअरिंग सिस्‍टम, 3-वे मेकॅनिकली-अ‍ॅडजस्‍टेबल आरामदायी ड्रायव्हिंग सीट आणि ईजी-शिफ्ट गिअर्स अशी प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत. सिग्‍ना 4825 टीकेचे सस्‍पेंडेड केबिन कमी एनव्‍हीएच वैशिष्‍ट्यांची खात्री देते आणि खडतर रस्‍त्‍यांवर देखील आरामदायी प्रवासाची खात्री देते. शक्तिशाली एअर कंडिशनिंग यंत्रणा सर्व वातावरणीय स्थितींमध्‍ये आरामदायी ड्रायव्हिंगची सुविधा देते. अपघातासंदर्भात चाचणी करण्‍यात आलेली केबिन, उच्‍च आसन स्थिती, मोठे डेलाइट ओपनिंग, रिअर व्‍ह्यू आरसा, ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट आरसा, भक्‍कम स्‍टील 3-पीस बंपर अशी वैशिष्‍ट्ये या ट्रकला देशातील सर्वात सुरक्षित टिपर ट्रक बनवतात.

तंत्रज्ञान-संचालित टिपर ट्रकमध्‍ये उत्तम वाहन नियंत्रण व कमी कार्यसंचालन खर्चांसाठी हिल स्‍टार्ट असिस्‍ट (एचएसए), इंजिन ब्रेक व आयसीजीटी ब्रेक यांसारखी आधुनिक पिढीतील वैशिष्‍ट्ये देखील आहेत. या पूर्णत: निर्माण करण्‍यात आलेल्‍या टिपर ट्रकमध्‍ये प्रगत इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणेसह टिपिंगच्‍या वेळी संभाव्‍य कोसळण्‍याचे निदान व प्रति‍बंध करण्‍यासाठी सेन्‍सर्स आहेत, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर व ऑपरेटर्सची सुरक्षितता वाढते. या ट्रकमध्‍ये अधिकतम फ्लीट व्‍यवस्‍थापनासाठी टाटा मोटर्सचे नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल सोल्‍यूशन दर्जात्‍मक ‘फ्लीट एज’ आहे. ज्‍यामुळे कार्यरत राहण्‍याची क्षमता अधिक वाढते आणि मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी होतो.

टाटा मोटर्स एम अ‍ॅण्‍ड एचसीव्‍ही ट्रकांची संपूर्ण रेंज उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम 6 वर्षे / 6 लाख किलोमीटर अंतराच्‍या वॉरण्‍टीसह येते. टाटा मोटर्स संपूर्ण 2.0 व टाटा समर्थची सेवा देखील देते. टाटा समर्थ अंतर्गत कंपनी व्‍यावसायिक वाहन ड्रायव्‍हर कल्‍याण, अपटाइम गॅरण्‍टी, ऑन-साइट सर्विस आणि प्रत्‍येक एम अ‍ॅण्‍ड एचसीव्‍हीसह सानुकूल वार्षिक मेन्‍टेनन्‍स व फ्लीट व्‍यवस्‍थापन सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.