TATA : टाटा मोटर्सने केला ‘टाटा पंच काझीरंगा’ संस्करणाचा लिलाव विजेता घोषित

एमपीसी न्यूज : भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह ब्रँड ‘टाटा मोटर्स’ने (Tata Motors) 1 मे ते 3 मे दरम्यान आयोजित केलेल्या ‘टाटा पंच काझीरंगा’ संस्करणाचा लिलाव विजेता 21 मे रोजी घोषित करण्यात आला. हा लिलाव सध्या चालू असलेल्या टाटा इंडियन प्रीमियर लीगच्या बाजूने झाला असून, दरम्यान टाटा आयपीएल टाटा पंच काझीरंगा एडिशन जिंकण्यासाठी चाहत्यांनी 9.49 लाखांच्या प्रारंभी बोलीवर ऑनलाइन बोली लावली.

पुण्यातील अमीन खान यांनी सर्वाधिक बोली लावल्याने त्यांना विजेता घोषित करण्यात आले. शिवाय, देशाच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्याची वचनबद्धता म्हणून ‘टाटा मोटर्स’ (Tata Motors) या लिलावातून मिळालेली रक्कम काझीरंगा नॅशनल पार्क, आसाम येथील वन्यजीव संरक्षणासाठी दान करणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर गाडीच्या चावीचा सुपूर्द सोहळा पार पडला. अमीन खान यांना कार व्यतिरिक्त मुंबईतील टाटा IPL लीग सामन्याची तिकिटे आणि अहमदाबाद येथे सर्वाधिक प्रतीक्षित टाटा IPL अंतिम सामन्याची दोन तिकिटे देण्यात आली. सोबतच, सर्व टाटा आयपीएल संघांच्या कर्णधारांनी स्वाक्षरी केलेला एक अनोखा राइनो प्लेक, नवीन कारसाठी टाटा पंच काझीरंगा अॅक्सेसरीज आणि सुंदर अशा काझीरंगा नॅशनल पार्कची चार जणांसाठी मोफत सशुल्क ट्रिप देखील देण्यात आली.

TATA

Talegaon Dabhade News : सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन – भाऊसाहेब भोईर

tata-kaziranga-edition-launch-price-1200x900

यावेळी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे विक्री, विपणन आणि ग्राहक सेवाचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले, की “आम्हाला आमच्या टाटा पंच काझीरंगा एडिशन लिलावाचे विजेते म्हणून अमीन खान यांची घोषणा करताना आनंद होत आहे. त्यांच्या उदार योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ज्याचा उपयोग आम्ही योग्य त्याच ठिकाणी नक्की करू. टाटा मोटर्समध्ये, आम्ही आमच्या देशाच्या विस्मयकारक जैवविविधतेचे जतन करण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ज्याचे कार्य पूर्ण करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे.

Chinchwad : सोलापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा संपन्न

पुढे ते म्हणाले, की आमच्या ऑफरवर, विविध भागधारकांशी तसेच विविध उपक्रमांद्वारे या रकमेसह आमची प्रतिबद्धतेसोबत काझीरंगा नॅशनल पार्कचे चालू असलेले संवर्धन आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या दिशेने पुढे जाणाऱ्या, या वचनाच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले आहे. मी खान यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी राष्ट्रीय उद्यानांच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार मानतो.”

satin-black TATA

Tata Motors ने या वर्षाच्या सुरुवातीला SUV विभागातील आपले नेतृत्व स्थान बळकट करत ‘Untamed Kaziranga ही SUV ची सुंदर अशी अभायरण्य संरक्षणावर आधारित आवृत्ती सादर केली. जी भारताच्या समृद्ध भौगोलिक आणि जैविक विविधतेने प्रेरित होती.

या काझीरंगावर भारतीय एक शिंगी गेंडयाचे चिन्ह आहे. ते चपळाई आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ठेवण्यात आले आहे. या श्रेणीने टाटा मोटर्सच्या खऱ्या एसयूव्ही लाइन-अपच्या ‘गो-एनीव्हेअर’ डीएनएला बळकटी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.