Tata Motors August Sales : ऑगस्ट महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात टाटाच्या 57 हजार 995 वाहनांची विक्री

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक महिन्यात टाटाच्या वाहनांची विक्री वाढत असून ऑगस्ट 2021 महिन्यात टाटाच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात 57 हजार 995 वाहनांची विक्री झाली. ऑगस्ट 2020 मध्ये ही संख्या 36 हजार 505 एवढी होती. टाटाकडून प्रसिद्ध करण्यात अलेल्या ऑगस्ट 2021 महिन्याच्या विक्री अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

ऑगस्ट 2021 महिन्याच्या विक्री अहवालानुसार, स्थानिक बाजारात 54 हजार 190 वाहनांची विक्री नोंदवली गेली आहे. जुलै 2021 मध्ये 51 हजार 981 वाहनांची विक्री झाली होती. तर, मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये हीच विक्री 35 हजार 420 एवढी होती. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वार्षिक विक्रीत 53 टक्के एवढा बदल दिसून आला आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये हेव्ही कमर्शिएल वेईकल 5 हजार 840, लाईट कमर्शिएल वेईकल 4 हजार 627, पॅसेंजर कॅरिअर 850, कार्गो पिकअप 14 हजार 855 तर, 3 हजार 609 कमर्शिएल वेईकलची निर्यात केली आहे. तसेच पॅसेंजर वेईकलमध्ये 26 हजार 996 गाड्या आणि 1 हजार 022 ईलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

टाटाच्या ईलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. ऑगस्ट 2021 महिन्यात 1 हजार 22 ईलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली आहे. वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आमच्या समोर असल्याचे टाटाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.