Pune : टाटा मोटर्सच्या कर्मचा-यांना मिळणार 36501 रुपयांचा बोनस

एमपीसी न्यूज –  टाटा मोटर्स, आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्या 2017-2018 वर्षासाठी बोनस आणि 2018-2019 या वर्षासाठी उत्पादनांशी निगडीत करारावर सह्या कऱण्यात आल्या.

कंपनीच्या पुणे व्यवस्थापनाच्यावतीने सर्वश्री अलोक कुमार सिंग, प्लांट हेड सीव्हीबीयु पुणे, जयदिप देसाई प्लांट हेड पीव्हीबीयु, पुणे, सरफराज मणेर, हेड – एचआर सीव्हीबीयु, रवी कुलकर्णी, हेड – ईआर आणि युनियनच्यावतीने सर्वश्री समीर धुमाळ – अध्यक्ष, उत्तम चौधरी – जनरल सेक्रेटरी, सतीश काकडे – कार्याध्यक्ष, यशवंत चव्हाण – खजिनदार, रमेश गारडे – जॉंईट सेक्रेटरी, अबिदअली सय्यद – कार्यकारीणी सदस्य, सुनील रसाळ – कार्यकारी सदस्य, सुरेश जासूद – प्रतिनिधी, राजेंद्र पाटील – प्रतिनिधी, शंकर निंबाळकर – प्रतिनिधी, पंडीत बिराजदार – प्रतिनिधी, उमेश म्हस्के – अध्यक्ष – कार प्लांट, अजित पायगुडे – प्रतिनिधी, संजीव असवले – प्रतिनिधी, संदीप अहेर – प्रतिनिधी यांनी सतीश बोरवणकर, कार्यकारी संचालक आणि सीओओ टाटा मोटर्स लि. यांच्या उपस्थितीत  सह्या  केल्या.

करारानुसार टाटा मोटर्सच्या कर्मचा-यांना बोनस आणि उत्पादनाशी निगडीत रक्कम  रु. 36501 /-  देण्यात येणार आहे.  याप्रसंगी सतीश बोरवणकर, कार्यकारी संचालक आणि सीओओ म्हणाले की, टाटा मोटर्सच्या प्रवासात बदलाची फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रवास याच पध्दतीने चालू राहणार असून आम्ही त्यासाठी आमच्या संबंधित सर्वाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहोत व त्यात विशेषत:  सर्व कर्मचारी आणि युनियन. आम्ही आमची कंपनी कर्मचा-यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याच्या मूल्याशी कटिबध्द असून आम्ही कामासाठी उत्कृष्ट वातावरण राखतो. ह्या करारानंतर आम्ही कर्मचारी आणि कंपनीयामध्ये पोषक आणि सशक्त वातावरण ठेवू शकतो.

टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुण्याचे अध्यक्ष समीर धुमाळ यावेळी म्हणाले की, मागील वर्षापेक्षा ह्या वर्षापेक्षा ह्या वर्षीची रक्कम ही जास्त असून कंपनीची उद्दीष्टे गाठण्यासाठी युनियन सदैव सहकार्य करेल अशी त्यांनी ग्वाही दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.