Bhor : कोंडगाव येथे टाटा मोटर्सकडून विहिर लोकार्पण

नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, गावक-यांनी व्यक्त केला आनंद

एमपीसी न्यूज – भोर तालुक्यातील कोंडगाव येथे टाटा मोटर्सच्या माध्यमातून विहीर लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यासाठी सुमंत मुळगांवकर फाऊंडेशन पुणे आणि ज्ञानप्रबोधिनी ग्राम विकसन विभाग यांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

या कोंडगाव विहिर लोकार्पण कार्यक्रमास टाटा मोटर्सचे सीएसआर अधिकारी मयुरेश कुलकर्णी, गिअर आणि एक्सल फॅक्टरीचे फॅक्टरी प्रमुख सुनील सवाई, हेड फायनान्स व्यंकट कृष्णा, हेड सीएसआर अचिंत्यसिंग, ज्ञानप्रबोधिनी ग्रामविकसन विभागाचे अनंत देशपांडे, अनंत अभंग आदी वरीष्ठ अधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

या विहिर लोकार्पणमुळे कोंडगाव येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. विहिर होण्याआधी गावातील नागरिकांना अडीच ते तीन किलोमीटरवरुन शेजारील गावातून पाणी आणावे लागत होते. अनेकांना पाणी प्रश्न भेडसावत होता. पण, आज पाण्याचा प्रश्न टाटा मोटर्सने मिटविल्याचा आनंद गावक-यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सुनील सवाई म्हणाले, “टाटा मोटर्स आणि ज्ञान प्रबोधिनी ह्यांच्यावतीने या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी गावक-यांसाठी मदत सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन ही समस्या दूर केली ती टीम वर्कने. माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा टाटा परिवाराने उतरवला. याचा आनंद गावक-यांच्या चेह-यावरुन दिसून येत होता. या माध्यमांतू समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न टाटा मोटर्सने केला आहे.

त्यानंतर अनंत अभंग म्हणाले की, ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमांतून गेली 50 वर्ष श्रमदानांतून बंधारे बांधले आहेत. स्थानिक लोकांचा सहभाग किती आहे हे महत्वाचे आहे. स्वत:च्या श्रमदानांतून बांधल्याचा अभिमान जास्त असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.