Mumbai : टाटा मोटर्सने लाँच केली विस्तारित कक्षेसह नवीन टिगोर ईव्ही

२१३ किलोमीटर्सपर्यंत विस्तारित कक्षा, एआरएआयचे प्रमाणपत्र

रुपये 9.44 लाख एक्सशोरूम दिल्ली (सरकारी सबसिडीज वजा जाता) या आरंभमूल्यापासून उपलब्ध

तीन प्रकारांत उपलब्ध –  एक्सईप्लस, एक्सएमप्लस आणि एक्सटीप्लस

एमपीसी न्यूज – सरकार तसेच ताफ्यात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी टिगोर ईव्ही बाजारात आणल्यानंतर टाटा मोटर्सने विस्तारित कक्षेसह टिगोर इव्ही इलेक्ट्रिक सेदान बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. या गाडीची कक्षा २१३ किलोमीटर असून, त्याला एआरएआयचे प्रमाणपत्र आहे. ही गाडी व्यक्तिगत वाहन विभागात तसेच ताफ्यात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक्सईप्लस, एक्सएमप्लस आणि एक्सटीप्लस अशा प्रकारांत उपलब्ध होईल. नवीन टिगोर ईव्ही ३० शहरांमध्ये रुपये 9.44 लाख, एक्सशोरूम दिल्ली (सरकारी सबसिडीज वजा जाता) या आरंभमूल्यासह उपलब्ध होईल. पात्र व्यावसायिक ग्राहकांना FAME II खाली इन्सेंटिव्ह मिळवून देण्यास हे वाहन सक्षम आहे. नवीन विस्तारित प्रकारामध्ये सुधारित ड्रायव्हिंग कक्षा, बाळगण्याचा कमी खर्च, कनेक्टिव्हिटी, सेदानचा आराम आणि शून्य कार्बन उत्सर्जन ही वैशिष्ट्ये आहेत.

टाटा मोटर्स लिमिटेडच्या इलेक्ट्रिक वाहन विभागातील विक्री, मार्केटिंग ग्राहकसेवा प्रमुख आशेष धर या नवीन प्रकाराच्या लाँचबद्दल म्हणाले, “टिगोर ईव्ही एक्स्टेण्डेड रेंज मॉडेल अधिक दीर्घ पल्ल्याची मागणी पूर्ण करणारी तसेच आमच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी अधिक उत्पन्नाची संभाव्यता देणारी आहे. पुरस्कारप्राप्त टिगोर ईव्हीने मिळवलेल्या यशाच्या पायावर हा नवा प्रकार घडवण्यात आला आहे. यापूर्वी टिगोर ईव्हीचा समावेश अनेक ताफ्यांमध्ये तसेच सरकारी ग्राहकांच्या वाहनांत करण्यात आला आहे. भारतात शाश्वत वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती आमची बांधिलकी या लाँचमधून पुन्हा एकदा दिसून आली आहे.”

नवीन टिगोर ईव्हीला दोन ड्रायव्हिंग मोड्स आहेत– ‘ड्राइव्हआणिस्पोर्ट’. ही गाडी पुढील वैशिष्ट्यांसह उपलब्ध होईल:

बाह्य

अंतर्गत

वैशिष्ट्यपूर्ण ईव्ही डेकल्स

अभिजात काळ्या राखाडी रंगातील अंतर्गत रचना

प्रीमियम फ्रंट ग्रिल

हरमानसह बुडवून टाकणारा ध्वनी अनुभव

शैलीदार मिश्रधातूंची चाके (अलॉय)

सिंगल स्पीड ट्रान्समिशन

शार्कफिन अँटेना आणि एलईडी हाय माउंटेड स्टॉप लॅम्प

उंची समायोजित करता येऊ शकेल अशी आसने

तीन अभिजात रंग:

पर्लेसंट व्हाइट, इजिप्शिअन ब्ल्यू आणि रोमन सिल्व्हर

आसनांसाठी श्रेष्ठ दर्जाचे फॅब्रिक

बॅटरी

2१. किलोवॉट अवर बॅटरी पॅकमुळे या नवीन मॉडेलची कक्षा लक्षणीयरित्या वाढली आहे

सभोवतालचे हवामान टोकाचे असतानाही सातत्यपूर्ण कामगिरी करेल अशा दृष्टीने डिझाइन केलेली बॅटरी कूलिंग प्रणाली

कारला चार्जिंग पोर्टस् आहेतवेगवान चार्जिंगसाठी तसेच संथ एसी चार्जिंगसाठी

याशिवाय, ही गाडी नियमित सुरक्षा फीचर्स अर्थात ड्युअल एअरबॅग्ज (एक्सईप्लस प्रकारात केवळ ड्रायव्हर एअरबॅग्ज) आणि अँटिलॉक ब्रेकिंग प्रणालीने सुसज्ज असेल. गाडीला वर्षे किंवा .२५ लाख किलोमीटर्स, यापैकी जे काही लवकर पूर्ण होईल, तोपर्यंतची अंगभूत वॉरंटी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.