Tata Motors : टाटा मोटर्सला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार

0

एमपीसी न्यूज – वाहन उत्पादन क्षेत्रात ऊर्जा संवर्धनाच्या दुष्टीकोनातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी टाटा मोटर्सला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कंपनीच्या जमशेदपूर, लखनऊ आणि पंतनगर येथील प्लॅन्टला प्रत्येकी पहिला, दुसरा आणि गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी (दि.12) या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उर्जा आणि नवीकरणीय (अपारंपररक) ऊर्जा राज्यमंत्री राज कुमार सिंह यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो (BEE) यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल बिझिनेसचे उपाध्यक्ष अजोय लाल म्हणाले, ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो (BEE) यांच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. प्रदुषण कमी करण्याच्या दुष्टीकोनातून आणि किफायतशीर वाहन निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वाहन निर्मिती प्लॅन्टमध्ये उर्जा संवर्धन करणे काळाची गरज आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दुष्टीने हे महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.