Tata Motors News : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. 8 मे 2021 पासून ही वाढ लागू करण्यात येणार असून, प्रकार आणि मॉडेलनुसार सरासरी 1.8 टक्के दरवाढ असेल.

टाटा मोटर्सच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, 7 मे रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या प्रवासी वाहनांच्या वाढीव किंमतीपासून ग्राहकांना सवलत मिळणार आहे. टाटा मोटर्सने आपले ग्राहक, विक्रेते आणि पुरवठादारांच्या हिताचे संरक्षण व सेवा करण्यासाठी सर्वसमावेशक ‘बिझिनेस चपलता योजना’ आणली आहे.

प्रवासी वाहन व्यवसाय अध्यक्ष शैलेश चंद्र यांच्या मते, स्टिल, धातू आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन 7 मे रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या प्रवासी वाहनांच्या वाढीव किंमतीपासून ग्राहकांना सवलत मिळणार आहे. आठ मेपासून मात्र दरवाढ लागू राहणार आहे. आमची नवीन उत्पादन बाजारातील मागणी वाढतच असल्याचे चंद्र यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.