Tata Motors News : तीन रूफटॉप मेगावॅट सोलर प्रकल्पासाठी टाटा मोटर्सचा टाटा पॉवर सोबत पीपीए करार

एमपीसी न्यूज – तीन रूफटॉप मेगावॅट सोलार प्रकल्पासाठी टाटा मोटर्सच्या पुण्यातील पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिट आणि टाट पॉवरसोबत पीपीए करार झाला आहे. हा सोलार रूफटॉप प्रकल्‍प प्रतिवर्ष जवळपास 45 लाख किलोवॅट ऊर्जा निर्माण करू शकेल. तसेच प्रतिवर्ष 3 हजार 538 टन कार्बन उत्‍सर्जन कमी करेल.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिट, ऑपरेशन्‍सचे उपाध्‍यक्ष राजेश खत्री म्‍हणाले, पृथ्‍वीवरील कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍यासाठी सुरू असलेल्‍या आमच्‍या प्रयत्‍नांमधील रूफटॉप मेगावॅट सोलार प्रकल्प हे महत्वपूर्ण पाऊल आहे. आमच्‍या उत्‍पादन केंद्रात ऊर्जेचे जतन करणे, अनवीकरणीय जीवाश्‍म इंधनांचा वापर, ऊर्जा उत्‍पादकता, वातावरणीय बदलावर मात आणि कमी कार्यसंचालन खर्च यासाठी आमचे प्रयत्‍न सुरूच राहतील.

टाटा पॉवरच्‍या सोलार रूफटॉप्‍स बिझनेसचे प्रमुख रविंदर सिंग म्‍हणाले, ‘टाटा मोटर्ससोबतचा हा एक महत्वपूर्ण करार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्‍यासाठी व नेट झीरो कार्बन ध्‍येय संपादित करण्‍यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. आम्ही केंद्रित हरित ऊर्जा सोल्‍यूशन्‍स सादर करत राहू आणि शुद्ध ऊर्जा संसाधनांचा अवलंब करत भागीदार व ग्राहकांना सक्षम करण्‍याचे कार्य सुरूच ठेवू.’

टाटा मोटर्सच्या आर्थिक वर्ष 2021 मध्‍ये पुणे व सानंद येथील कंपनीच्‍या कार प्‍लांटनी 26.10 दशलक्ष किलोवॅट नवीकरणीय वीज निर्माण केली. जी त्‍यांच्‍या एकूण वीज (111.3 दशलक्ष युनिट्स) वापराच्‍या 25 टक्‍के आहे. यामुळे 18 हजार 672 मेट्रिक टन कार्बन डायऑक्‍साईड (CO2) उत्‍सर्जन कमी झाले. कंपनी 2030 पर्यंत 100 टक्‍के नवीकरणीय ऊर्जेचा स्रोत देण्‍याचे ध्‍येय गाठण्यासाठी अधिक स्रोत देण्‍याचा विचार करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.