Kalewadi News : साईबाबा ऑटो व्हील्समध्ये टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ‘ईव्ही’ मॅक्स कारचे दिमाखात लॉचिंग

सिंगल चार्जमध्ये 437 किमी धावणार; कारची किंमत 17.74 लाख रुपये

एमपीसी न्यूज – काळेवाडीतील साईबाबा ऑटो व्हील्समध्ये टाटा मोटर्सच्या एका चार्जिंगमध्ये 437 किलोमीटर अंतर पार करणा-या नेक्सॉन इलेक्ट्रॉनिक व्हेईकल (ईव्ही) मॅक्स कारचे आज (गुरुवारी) मोठ्या दिमाखात लॉंचिंग करण्यात आले. टाटा मोटर्सचे रिजनल मॅनेजर अमित सिन्हा आणि साईबाबा ऑटो व्हील्सचे संचालक कृपाल गेहानी यांच्या हस्ते या कारचे लॉचिंग करण्यात आले. 17 लाख 74 हजार रुपये किमतीची पर्यावरणपूरक ही चारचाकी सिंगल चार्जिंगमध्ये 437 किलोमीटर अंतर पार करते.

साईबाबा ऑटो व्हील्सचे संचालक राजकुमार गेहानी, साईओ संजय गुरम यांच्यासह ग्राहक, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पर्यावरणपूरक नेक्सॉन ईव्ही मॅक्स कार बुक करणारे ग्राहक रामनाथन अय्यर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. साईबाबा ऑटो व्हील्सच्या काळेवाडी, हडपसर, मांजरी या तीन शाखेत एकाचवेळी नेक्सॉन ईव्ही मॅक्स कारचे लॉंचिंग झाले आहे. तीनही शाखेमध्ये आजपासून ही पर्यावरणपूरक ईव्ही विक्रीसाठी ठेवली आहे. कारचा लूक देखणा आहे.

नेक्सॉन ईव्ही मॅक्स या कारची किंमत ग्राहकांना परवडेल अशी आहे. 17 लाख 74 हजार रुपयांमध्ये (एक्स शोरुम) ही कार मिळते. या कारमध्ये आरामदायक, व्हेंटिलेटड सीट आहेत. ड्रायव्हिंग मोड्स, वायरलेस चार्जिंग पॉइंटसह विविध सुविधा देखील कारमध्ये आहेत. सिंगल चार्जिंगमध्ये नेक्सॉन ईव्ही मॅक्स ही कार 437 किलोमीटरचे अंतर पार करते. ही इलेक्ट्रिक कार केवळ 9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग धारण करु शकते. या कारचा टॉप स्पीड 140 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

0 ते 80 टक्के चार्जिंग 56 मिनिटांमध्ये होते. तर, 100 टक्के चार्जिंग साडेसहा तासात होते. एसी फास्ट चार्जरद्वारे बॅटरी चार्ज केली तर ती पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेसहा तास इतका वेळ घेते. कारची बॅटरी 40.5 किलो वजनाची आहे. बॅटरीची वॉरंटी 8 वर्षे किंवा 1 लाख 60 हजार किलोमीटर कारची रनिंग होईपर्यंत बॅटरी टिकते. या कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

टाटा मोटर्सचे रिजनल मॅनेजर अमित सिन्हा म्हणाले, ”नेक्सॉन ईव्ही मॅक्स या कारमध्ये विविध सुविधा दिल्या आहेत. स्मार्टफोन वॉच कनेक्टिव्हीटी, वायरलेस चार्जिगची व्यवस्था आहे. पर्यावरणपूरक कार आहे. टाटा मोटर्स कंपनीने इलेक्ट्रिक वाहने लाँच करुन येणा-या पिढीसाठी चांगले काम केले आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत, जेणेकरुन प्रदुषण कमी होईल”.

साईबाबा ऑटो व्हील्सचे संचालक कृपाल गेहानी म्हणाले, ”नेक्सॉन ईव्ही मॅक्स या कारची किंमत ग्राहकांना परवडेल अशी आहे. सिंगल चार्जिंगमध्ये ही कार 437 किलोमीटर अंतर पार करते. कोणतीही यांत्रिक इंजिन नाही म्हणजे गोंगाट नाही. इलेक्ट्रिक मोटर कोणताही आवाज न करता काम करते. त्यामुळे प्रवासी आणि चालकाला आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो. बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढली आहे. नेक्सॉन ईव्ही मॅक्स ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.