Tata Motors : 1 ऑक्टोबर पासून टाटाच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ

एमपीसी न्यूज – व्यावसायिक वाहनांच्या किंमतील 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय टाटा मोटर्सने घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2021 पासून ही वाढ लागू केली जाईल. वाहन आणि मॉडेल यानुसार ही वाढ लागू होईल.

टाटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पोलाद, मौल्यवान धातूंच्या वाढलेली किंमत यामुळे उत्पादनाची देखील किंमत देखील वाढवावी लागत असल्याचे टाटाने म्हटले आहे. याही पुढे जाऊन कंपनीने उत्पादनाची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्राहकांना बजेटमध्ये वाहन उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मोटर्स प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.